भारत आणि युके नं महत्त्वाकांक्षी आणि परस्पर लाभदायक मुक्त व्यापार करारासोबतच दुहेरी योगदान करार यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युके चे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याबरोबर चर्चा केली. या ऐतिहासिक करारांमुळे दोन्ही देशातली धोरणात्मक भागिदारी, व्यापार, गुंतवणूक, विकास, रोजगार निर्मिती आणि नवोन्मेषाला चालना मिळेल, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. स्टार्मर यांचं भारतात स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.
Site Admin | May 6, 2025 7:57 PM | India | UK
भारत आणि युके यांच्यात मुक्त व्यापार करारासोबतच दुहेरी योगदान करार
