डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी सुरु

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं  येत्या १५ दिवसांत ३२ वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत. 

 

खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला पाठिंबा देण्याची विनंती केली. पहलगाम इथल्या  दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांप्रती जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांनी सहवेदना व्यक्ती  केली. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला समर्थन देणं चूक असून जपान दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारतासोबत आहे, असं इवाया म्हणाले. 

 

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने  आज सकाळी संयुक्त अरब अमिरातीत तिथले सलोखा विषयक विभागाचे मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांच्याबरोबर चर्चा केली. या ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून अशा प्रकारचे  आयोजन करणारा युएई हा पहिलाच  देश आहे. 

 

द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली तिसरं शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया आणि रशिया या पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झालं आहे. याचबरोबर खासदार बैजयंत पांडा, खासदार रविशंकर प्रसाद, खासदार शशी थरूर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील  इतर चार शिष्टमंडळं येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या देशांना रवाना होतील. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा