दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळं लवकरच वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहेत. या संदर्भात, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्या खासदारांची आणि सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालचा गट सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत आणि अल्जेरियाला भेट देईल.
भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचा गट यूके, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन, इटली आणि डेन्मार्कला भेट देईल.
जदयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालचा गट इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूरला भेट देईल.
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा गट युएई, लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओनला भेट देईल.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालचा गट अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबियाला भेट देईल.
द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालचा सहावा गट स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया आणि रशियाला भेट देईल.
आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचा गट इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिकेला भेट देईल.