जहाजबांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत भारताची गणना जगातल्या सर्वोत्तम १० देशांमध्ये तर २०४७ पर्यंत सर्वोत्तम ५ देशांमध्ये होईल, असं प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं आहे. ते काल तामिळनाडू इथं चिदम्बरनार बंदराच्या पहिल्या बंदर आधारित हरित हायड्रोजन पथदर्शी प्रकल्पाचं उद्घाटन करताना बोलत होते. जहाजबांधणी क्षेत्रात जगातल्या सर्वोत्तम देशांमध्ये गणना होण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ध्येय साकार करण्याच्या दृष्टीनं देश महत्वपूर्ण पावलं उचलत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आधुनिकीकरण आणि क्षमता वृद्धीसाठी केवळ या बंदरांमध्ये झालेली १६ हजार कोटीहून अधिक गुंतवणूक असामान्य असल्याचं सोनोवाल म्हणाले.
Site Admin | September 6, 2025 2:34 PM | चिदम्बरनार बंदर | तामिळनाडू | सर्बानंद सोनोवाल
जहाजबांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत भारताची गणना सर्वोत्तम ५ देशांमध्ये होईल – सर्बानंद सोनोवाल
