अँडरसन – तेंडुलकर चषक क्रिकेट स्पर्धेतल्या, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ४ गडी बाद ३०४ धावा झाल्या आहेत. त्यामुळं भारताकडे एकूण ४८४ धावांची आघाडी झाली आहे. पहिल्या डावात द्विशतक ठोकणारा कर्णधार शुभमन गिल यानं या डावात नाबाद शतक ठोकलं. केएल राहुल आणि ऋषभ पंत वेगवान अर्धशतक करुन बाद झाले.