प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया स्टील 2025 या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्टील प्रदर्शनाचं दूरस्थ माध्यमातून उद्घाटन होणार आहे. तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत जागतिक पोलाद मूल्य साखळीतील आघाडीचे देश एकत्र येऊन, भविष्यातील वाटचालीवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छत्तीसगड आणि ओडिशाचे मुख्यमंत्री सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
Site Admin | April 24, 2025 1:27 PM | India Steel Expo 2025 | PM Narendra Modi
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘इंडिया स्टील २०२५’ चं उद्घाटन होणार
