श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी भारत आणि श्रीलंकेच्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार झाला. या दोन्ही कंपन्यांमध्ये भारताची पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड आणि श्रीलंकेच्या एका खासगी कंपनीचा समावेश आहे. या करारावर श्रीलंकेच्या उर्जा मंत्री कांचना विजशेखर आणि भारताचे उच्च उपायुक्त डॉ. सत्यंजल पांडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे श्रीलंकेच्या शाश्वत उर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे. या करारांतर्गत कोलंबोजवळच्या केरावलापिटिया इथं १ हजार मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे उर्जा प्रकल्प विकसित होणार आहेत. संकटकाळात श्रीलंकेला मदत केल्याबद्दल विजशेखर यांनी भारताचे आभार मानले आहेत.
Site Admin | August 20, 2024 6:33 PM | India & Sri Lanka | Infrastructure Development | LNG
पायाभूत सुविधांच्या विकास आणि द्रवरूप नैसर्गिक यूचा पुरवठा करण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार
