भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त सैनिकी सराव ‘मित्र शक्ती’चा समारोप

भारत आणि श्रीलंका सैन्यदलांमधला दहावा संयुक्त  सैनिकी सराव  नुकताच पार पडला. श्रीलंकेतल्या मदुरू ओया इथल्या संरक्षण प्रशिक्षण शाळेत पार पडलेल्या या सरावसत्राला “मित्र शक्ती” असं नाव देण्यात आलं आहे. यावेळी श्रीलंकेतले भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे संरक्षण राज्यमंत्री प्रेमिथा बंधारा तेन्नाकुन यावेळी उपस्थित होते. त्यानंतर झा यांनी यात सहभागी झालेल्या राजपुताना रायफल्सच्या १०६ भारतीय जवानांची आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. श्रीलंकेच्या गजबा रेजिमेंटने या सराव सत्रात भाग घेतला. श्रीलंका आणि भारत या दोन्ही राष्ट्रात हा संयुक्त सराव दरवर्षी आलटून पालटून घेतला जातो.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.