भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या दुसरा सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. रायपूर इथं भारतीय थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. भारत सध्या या मालिकेत १-०नं आघाडीवर आहे. पहिला सामना भारतानं १७ धावांनी जिंकला होता. याशिवाय, या सामन्यात बरेच विक्रमही प्रस्थापित झाले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षट्कार ठोकायचा विक्रम रोहित शर्मानं आपल्या नावावर केला. तसंच सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळायचा विक्रम रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावावर झाला.