भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात भारत अजुनही ४८० धावांनी पिछाडीवर आहे.
त्याआधी आज दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात ४८९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अखेरच्या ४ गड्यांनी आज धावसंख्येत २५२ धावांची भर घातली. सेनुरान मुथुसामी यानं १०९ धावांची शतकी खेळी केली. तर मार्को यान्सनचं शतक थोडक्यात हुकलं. त्यानं ९३ धावा केल्या.
भारताच्या वतीनं कुलदीप यादव यानं सर्वाधिक ४, तर बुमराह, सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येक २ गडी बाद केले.
सलग दुसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला तेव्हा भारतानं आपल्या पहिल्या डावात बिनबाद ९ धावा केल्या होत्या.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.