December 6, 2025 8:23 PM | India-South Africa

printer

ODI Cricket: भारताची विजयाकडे वाटचाल

विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत सध्या मजबूत स्थितीत आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३३ षटकांत १ बाद २०१ धावा झाल्या होत्या. सलामीवीर रोहित शर्मा ७५ धावा काढून बाद झाला. यशस्वी जयस्वाल ९४ धावांवर खेळतो आहे. 

नाणेफेक जिंकून भारतीय संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा पूर्ण संघ ४७ षटकं आणि ५ चेंडूंमध्ये २७० धावा काढून तंबूत परतला. क्विंटन डिकॉक यानं १०६ धावांची उत्तम खेळी केली, तर कर्णधार टेम्बा बवुमा यानं ४८ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ खेळाडू बाद केले. 

आजचा सामना जिंकून मालिका २-१ नं जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.