डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 13, 2025 8:26 PM | India Singapore

printer

भारत-सिंगापूरदरम्यान नवी दिल्लीत मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत चर्चा

भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेचा तिसरा टप्पा आज नवी दिल्लीत पार पडला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल तर सिंगापूरचे उपप्रधानमंत्री गॅन किम योंग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री जोसेफिन तेओ या परिषदेला उपस्थित होते. भारत-सिंगापूर व्यापक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल डॉ. जयशंकर यांनी त्यांचे आभार मानले. भारत-सिंगापूर संबंध दृढ करण्यासाठी सरकार आणि उद्योग यांच्यातला समन्वय महत्त्वाचा असल्याचं मत जयशंकर यांनी मांडलं. त्यानंतर सिंगापूरच्या प्रतिनिधीमंडळानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा