भारतानं फ्रान्सकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या करारावर काल स्वाक्षरी केली. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे सशस्त्र दल प्रमुख सॅबॅस्टीअन लेकोर्नु यांनी नवी दिल्ली इथं या आंतर सरकारी करारावर स्वाक्षरी केली.
या 26 राफेल सागरी लढाऊ विमानांपैकी 22 विमानं ही एक आसन व्यवस्था असलेली आणि 4 विमानं दुहेरी आसन व्यवस्था असलेली असतील. भारतीय नौदलाच्या मागणी नुसार या विमानांची रचना करण्यात आली असून 2030 पर्यंत ही सर्व विमानं लष्करी विमानांच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.