डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 27, 2024 8:16 PM | GDP

printer

चालू आर्थिक वर्षात भारत जीडीपी 6.5 टक्के ते ७ टक्के दर गाठू शकेल – अर्थ मंत्रालय

चालू आर्थिक वर्षात जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा साडेसहा ते सात टक्के दर भारत गाठू शकेल, असं अर्थ मंत्रालयानं ऑगस्टच्या मासिक वित्त आढाव्यात म्हटलं आहे. प्रमुख बिगर कृषी क्षेत्रांच्या वाढीचा दर पाच टक्के राहिल्यामुळे पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासाचा वेग कायम राहिला होता, असं मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केलं आहे. किरकोळ दरावर आधारित चलन फुगवट्याचा दर ऑगस्ट महिन्यात ३ पूर्णांक सात दशांश टक्के इतका मध्यम राहिल्याचं या अहवालात म्हटलं आहे.