प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बीन सलमान यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी सुरक्षा, ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, संस्कृती आदि मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी चार महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात अंतराळ संशोधन, आरोग्य आणि डोपिंग विरोधी क्षेत्राचा समावेश आहे. सौदी अरेबियाने भारतात ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यामधे स्वारस्य दाखवलं आहे.
Site Admin | April 23, 2025 10:51 AM | India | PM Narendra Modi | Saudi Arabia Visit
भारत-सौदी अरेबिया यांच्यात चार सामंजस्य करार
