डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत आणि रशियामध्ये परस्पर सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध – मंत्री एस. जयशंकर

भारत आणि रशिया विविध क्षेत्रात एकत्र कार्य करत असून त्यामुळे परस्पर सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज मॉस्कोत भारत रशिया व्यावसायिक फोरममध्ये बोलत होते. उद्योजकांनी आता अधिकाधिक व्यवसाय करावा त्याचप्रमाणे गुंतवणूक आणि सहकार्य करारांच्या माध्यमातून नवनव्या क्षेत्रात आर्थिक भागिदारी वाढवावी असंही ते म्हणाले. कोविडच्या संकट काळात विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण भागिदारीची आवश्यकता अधोरेखित झाली असंही त्यांनी सांगितलं.  भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य अधिक वृद्धींगत होण्याच्या दृष्टीनं एस. जयशंकर हे आज रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जी लेवरोव यांची भेट घेणार आहेत.