December 6, 2025 9:15 AM | India Russia

printer

येत्या पाच वर्षात आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भारत आणि रशियामध्ये सहमती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात नवी दिल्लीतल्या हैद्राबाद हाऊसमध्ये झालेल्या 23व्या वार्षिक शिखर संमेलनात संरक्षण, व्यापार, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रातील सहकार्यासाठी महत्त्वाचे करार करण्यात आले. भारताला इंधनाचा अखंड पुरवठा करण्याची, तसंच ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची तयारीही रशियानं दाखवली. आर्थिक आणि व्यापारी भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि रशियादरम्यान 2030 पर्यंतच्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर यावेळी सहमती झाली.