December 5, 2025 1:05 PM | India Russia

printer

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातउच्चस्तरीय बैठक

भारताच्या दौऱ्यावर आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. या बैठकीत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार असून क्षेत्रीय आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. याशिवाय व्यापार, वित्त, आरोग्यसेवा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित सामंजस्य करार देखील होणार आहेत. 

 

तत्पूर्वी, तेविसाव्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतिन यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुतीन यांचं आज सकाळी राष्ट्रपतीभवनात स्वागत करण्यात आलं. पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांचं स्वागत केलं. लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, दोन्ही देशांचे प्रमुख मंत्री आणि अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. त्याआधी पुतीन यांनी नवी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.