December 15, 2025 11:06 AM

printer

भारतानंं बांगलादेशचे दावे फेटाळले

बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना त्यांच्या समर्थकांना भडकावणारी विधानं करण्यासाठी नवी दिल्लीमधून प्रोत्साहन मिळत असल्याच्या बांगलादेशमधील अंतरिम सरकारनं एका निवेदनाद्वारे केलेल्या दाव्याचं भारतानं स्पष्टपणे खंडन केलं आहे. याबाबत प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात भारताच्या परराष्ट्र व्यवहार  मंत्रालयानं म्हटलं आहे की भारतानं बांगलादेशमध्ये शांततापूर्ण वातावरणात मुक्त, निष्पक्ष, समावेशक आणि विश्वासार्ह निवडणुका घेण्याच्या बाजूने आपली भूमिका सातत्यानं पुन्हा पुन्हा मांडली आहे. बांगलादेशचं अंतरिम सरकार शांततापूर्ण निवडणुका घेण्यासह अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करेल, अशी भारताला आशा असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.