डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला भारताचा नकार

चीनच्या किंगदाओ इथं झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला आहे. घोषणापत्रात सीमापार दहशतवादी कारवायांचा उल्लेख नसल्यानं भारतानं नाराजी व्यक्त करत स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दहशतवाद, कट्टरतावाद आणि अतिरेकी कारवाया हे प्रादेशिक शांतता आणि परस्पर विश्वासासाठी सर्वात मोठे धोके असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत सांगितलं.

 

दहशतवाद, आणि शांती-समृद्धी एकत्र नांदू शकत नाहीत, हे लक्षात घेऊनच भारतानं सीमापार दहशतवादाची पायाभूत संरचना मोडण्यासाठी ऑपरेशन सिन्दूरच्या माध्यमातून आत्मरक्षणाचा अधिकार वापरला. दहशतवाद्यांचे तळ आता सुरक्षित नाहीत आणि त्यांना लक्ष्य करण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही, असं सज्जड दम त्यांनी भरला. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी दुटप्पी भूमिका न घेता दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या देशांचा निषेध करावा, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा