आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि चीन यांच्यात लढत

आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान चीनशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. भारतीय संघानं काल दक्षिण कोरियावर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून भारतीय हॉकी संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिला आहे. 2011, 2016, 2018 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ आज पाचव्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करेल.