भारताची जागतिक टपाल संघटनेच्या परिषदेत पुन्हा निवड

दुबई इथं झालेल्या 28 व्या जागतिक टपाल परिषदेदरम्यान भारताची जागतिक टपाल संघटनेच्या प्रशासन परिषदेत पुन्हा निवड झाली आहे. भारताची पुनर्निवड आंतरराष्ट्रीय समुदायाचा इंडिया पोस्टच्या नेतृत्वावर, सुधारणांवर आणि नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांवर असलेला विश्वास दर्शवणारी असल्याचं. दळणवळण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे. भारत 1876 पासून जागतिक टपाल संघटनेचा सदस्य आहे आणि जागतिक पोस्टल नेटवर्क मजबूत करण्यासाठी सातत्याने योगदान देत आहे.

 

भारत जागतिक टपाल क्षेत्राचे भविष्य घडवण्यात, नावीन्यपूर्ण, समावेशक आणि विकासाला चालना देण्यात सक्रिय भूमिका बजावत राहील. प्रशासकीय परिषदेत नेतृत्वाची भूमिका बजावण्याचा आपला हेतूही भारताने व्यक्त केला आहे.