भारतात २०२३-२४ या आर्थिक वर्षात १४४ अब्ज टन पोलाद निर्मिती झाली असून भारत पोलाद निर्मिती करणारा जगातला दुसरा देश असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद राज्यमंत्री भुपतीराजु श्रीनिवास वर्मा यांनी म्हटलं आहे. खनिज, धातू, धातूशास्त्र परिषदेच्या उद्घाटनावेळी ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते. पोलाद उद्योगातली कार्यक्षमता आणि तंत्रज्ञानातल्या नवोन्मेषाचं वर्मा यांनी कौतुक केलं.
Site Admin | September 28, 2024 8:20 PM | भुपतीराजु श्रीनिवास वर्मा
भारत पोलाद निर्मिती करणारा जगातला दुसरा देश – केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद राज्यमंत्री भुपतीराजु श्रीनिवास वर्मा
