डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 28, 2024 8:00 PM | FATF | India

printer

एफएटीएफच्या मूल्यमापन अहवालात भारताला नियमित पाठपुरावा श्रेणीत स्थान

मनीलाँड्रिंग आणि दहशतवादाला पैसा पुरवणं यामुळे तयार होणारे धोके टाळण्यासाठी भारतानं केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेत एफएटीएफ अर्थात फायनान्सिअल ॲक्शन टास्क फोर्सनं आपल्या परस्पर मूल्यमापन अहवालात भारताला नियमित पाठपुरावा श्रेणीत स्थान दिलं आहे. या कृती गटाच्या सिंगापूर इथं झालेल्या दोन दिवसीय बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला. आज या बैठकीचा समारोप झाला. 

 

जी २० देशांपैकी फक्त इतर चार देशांना हा मान मिळाला आहे. रोखीनं होणारे व्यवहार ते डिजिटल अर्थव्यवस्थेकडे होणारं स्थित्यंतर तसंच जनधन, आधारची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी भारतानं केलेले प्रयत्न याला दिलेली ही पोचपावती आहे, असं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय  स्तरावर आर्थिक गुन्ह्यांवर देखरेख ठेवणारा हा आर्थिक कृतीगट १९८९ मधे स्थापन झाला.