September 22, 2025 1:23 PM | India | Philippines

printer

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी घेतली फिलिपिनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट

अमेरिकेत न्यूयॉर्क इथं होणाऱ्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ऐंशीव्या सत्राच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज फिलिपिनच्या परराष्ट्र मंत्री थेरेसा लाझारो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्र आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. फिलिपिनचे अध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांनी अलिकडेच भारताचा दौरा केला होता. या भेटीत राजकीय, संरक्षण तसंच सागरी क्षेत्रात सक्रिय सहकार्याच्या दृष्टीने दोन्ही देशांनी आपल्या धोरणात्मक भागीदारासाठी वचनबद्धता स्पष्ट केल्याचं फिलिपिनच्या परराष्ट्र मंत्री थेरेसा लाझारो यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.