फिलीपीनचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनिअर यांचं आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. यावेळी पाहुण्यांना पारंपरिक मानवंदना देण्यात आली. मार्कोस यांनी सपत्नीक राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर पुष्पार्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली.
प्रधानमंत्री मोदी आणि फिलीपीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात आज नवी दिल्लीत प्रतिनिधीमंडळस्तरीय बैठक होणार आहे. या चर्चेमुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला.
मोदी आणि मार्कोस यांच्या उपस्थितीत आज अनेक संयुक्त सहकार्य करारांवरही स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सहकार्य, कृषी, औषधनिर्माण अशा विविध मुद्यांचा आढावा आजच्या चर्चेत घेतला जाणार आहे.