प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड रोमुआल्देझ मार्कोस ज्युनिअर यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा आज होणार आहे. मार्कोस सध्या भारताच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. उभय नेत्यांमधल्या चर्चेमुळे द्विपक्षीय संबंध दृढ होतील, असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी व्यक्त केला आहे. मोदी आणि मार्कोस यांच्या उपस्थितीत आज अनेक संयुक्त सहकार्य करारांवरही स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सहकार्य, कृषी, औषधनिर्माण अशा विविध मुद्यांचा आढावा आजच्या चर्चेत घेतला जाणार आहे.
Site Admin | August 5, 2025 12:31 PM | India-Philippines
प्रधानमंत्री आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा
