फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लुईस अरानेता मार्कोस आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. फिलीपिन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मार्कोस ज्युनियर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचीही ते भेट घेणार आहेत. फिलीपिन्सला परतण्याआधी मार्कोस बंगळुरूला भेट देणार आहेत. दोन्ही देशांमधील परस्परसंबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने मार्कोस यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
Site Admin | August 4, 2025 10:28 AM | India-Philippines
फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर
