ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पूंछ, राजौरी, कुपवाडा, बारामुल्ला भागात पाकिस्तानच्या लष्करानं नियंत्रण रेषेच्या आसपास जोरदार गोळीबार केला. यात १५ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४३ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या गोळीबीराला भारतीय लष्करानंही सडेतोड उत्तर दिलं. या गोळीबारात या भागातल्या अनेक घरांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
Site Admin | May 7, 2025 7:02 PM | India Pakistan War
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन
