गोळीबार न करण्यावर भारत-पाकिस्तानमध्ये सहमती

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सैनिकी कारवाई महासंचालक स्तरावर चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूंच्या सैन्याकडून बंदूकीची एकही गोळी झाडली जाता कामा नये, तसंच एकमेकांविरुद्ध कोणतीही आक्रमक कारवाई केली जाऊ नये यावर सहमती झाल्याचं भारतीय लष्करानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सीमेवर सैन्य कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यालाही दोन्ही देशांच्या लष्करानं संमती दर्शवली आहे. दरम्यान सीमावर्ती भागात एवढ्यात शत्रूचे कोणतेही ड्रोन आढळल्याची माहिती नाही. परिस्थिती शांत आणि पूर्ण नियंत्रणात आहे, असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.