अफगाणी नागरिकांना भारताची मदत

पाकिस्ताननं त्यांच्या देशातल्या अफगाणी नागरिकांना परत पाठवायला सुुरुवात केली असून भारतानं या कुटुंबांना मानवीय दृष्टीकोनातून मदत पाठवली आहे. पाकिस्ताननं पाच हजार अफगाणी कुटुंबांना परत पाठवलं होतं. भारतानं या कुटुंबांना ११ प्रकारची अन्न पाकिटं पुरवली आहेत. काबुलच्या स्थलांतरीत निदेशालयातर्फे या मदतीचं वाटप करण्यात आलं. या मदतीबद्दल अफगाणीस्ताननं भारताचे आभार मानले असून इतर देशांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे.