भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादावरुन पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका केली आहे. भारत गेल्या अनेक दशकांपासून सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असल्याचं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी म्हटलं आहे. सशस्त्र संघर्षांमध्ये नागरिकांच्या संरक्षणावरील खुल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.
पाकिस्ताननं दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वारंवार नागरिकांचा ढाल म्हणून वापर केला, ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या कुख्यात दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानातील वरिष्ठ सरकारी, पोलिस आणि लष्करी अधिकारी उपस्थित असल्याचं जगानंही पाहिलं असून पाकिस्तानी सैन्यानं या महिन्याच्या सुरुवातीला जाणूनबुजून भारतीय सीमावर्ती गावांना लक्ष्य केलं होतं, असंही पी. हरिश यांनी म्हटलं आहे.