डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 24, 2025 8:56 AM | India | Pakistan

printer

भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय

दुबईमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला.प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सर्वबाद २४१ धावा केल्या तर प्रत्युत्तर दाखल ४५ चेंडू राखत विराट कोहलीच्या संयमी शतकाच्या आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं हे उद्दिष्ट केवळ चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. पाकिस्तानकडून सौद शकीलने ६२ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवनं तीन तर हार्दिक पांड्यानं दोन बळी घेतले. या सामन्याद्वारे विराट कोहलीने १४ हजार धावांचा टप्पा सर्वात कमी डावात पार केला. भारताचा पुढील सामना न्यूझीलंड विरुद्ध २ मार्च रोजी होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.