पाकिस्तान भारताविरुद्ध निराधार आणि प्रक्षोभक निवेदनं देऊन संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या व्यासपीठाचा गैरवापर करत असल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या ६० व्या अधिवेशनात जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी राजदूत क्षितीज त्यागी यांनी, पाकिस्ताननं भारतीय भूभाग बळकावण्याऐवजी तो खाली करून मरणासन्न अवस्थेत असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला या अवस्थेतून बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करावं अशा शब्दात सुनावलं. दहशतवाद्यांची निर्यात, संयुक्त राष्ट्रसंघानं दहशतवादी घोषित केलेल्यांना आश्रय देणं आणि आपल्याच नागरिकांवर बॉम्ब हल्ले करण्यातून कधी तरी वेळ काढावा अशी बोचरी टीकाही त्यागी यांनी केली.
Site Admin | September 24, 2025 1:39 PM | India | Pakistan
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या व्यासपीठाचा गैरवापर करत असल्याबद्दल भारताची पाकिस्तानवर टीका
 
		