पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. ज्या पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा दिलेला आहे त्यांचा व्हिसा २७ एप्रिलला रद्द केला जाईल. तसंच वैद्यकीय व्हिसा देखील २९ एप्रिलला रद्द होईल. व्हिसा रद्द होण्याच्या अंतिम दिवसाच्या आधी पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय नागरिकानी पाकिस्तानात जाऊ नये तसंच जे नागरिक पाकिस्तानात आहेत त्यांनी लवकरात लवकर परत यावं असंही परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
Site Admin | April 24, 2025 7:59 PM | India | Pakistan | VISA
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद
