डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 25, 2025 8:27 PM

printer

जपानला मागे टाकत भारत जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था-नीती आयोग

जपानला मागे टाकत भारत जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी सांगितलं. नीती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी असल्याचं सुब्रमण्यम म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलरची असून जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, भारत लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल असा विश्वास सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला.