नवी दिल्लीत येत्या १३ ते १८ जानेवारी दरम्यान इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअमवर योनेक्स-सनराईज इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा भारतीय संघात किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि मालविका बनसोड यांचा समावेश आहे.
स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात पहिल्या फेरीत गतवर्षीची विजेती पी. व्ही. सिंधू हिचा सामना व्हिएतनामच्या थुई लिन्ह गुयेन हिच्याशी होणार आहे. याआधी झालेल्या लढतींमध्ये गुयेन हिनं सिंधूला दोनवेळा पराभूत केलं होतं.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यात लढत होणार आहे. दुहेरी प्रकारात चिराग शेट्टी–सात्विक साईराज रंकीरेड्डी तर महिला दुहेरीत त्रिशा जॉली–गायत्री गोपीचंद या जोड्यांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.