न्यूझीलंडबरोबर मुक्त व्यापार करारासंदर्भातल्या चर्चेची चौथी फेरी आज पूर्ण झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅक क्ले यांनी या वाटाघाटींबद्दल समाधान व्यक्त केलं. या करारामुळे उभयपक्षी व्यापार, गुंतवणूक, पुरवठा साखळी आणि बाजारपेठेची उपलब्धता यांना चालना मिळेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. या करारामुळे कृषी, अन्नप्रक्रिया, नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण, औषध निर्मिती आणि सेवा क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. या कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरुप देण्याबाबत वचनबद्ध असल्याचंही दोन्ही मंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, गोयल यांनी आज मेलबर्न इथं ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फॅरेल तसंच कौशल्य आणि प्रशिक्षण मंत्री अँड्र्यू गिल्स यांच्याशी चर्चा केली.