भारत आणि न्यूझीलंड संबंधांचा विविध क्षेत्रात विस्तार – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील संबंध विविध क्षेत्रात विस्तारत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांच्याशी काल नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर जयशंकर यांनी हे विधान केलं. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांनी नुकतीच भारताला भेट दिली, त्यामध्ये उभय देशांमध्ये मुक्त व्यापार करारासंबंधीच्या वाटाघाटींना सुरुवात झाली तसंच विविध करार करण्यात आले, त्यामुळं त्यांची ही भेट यशस्वी ठरली होती असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं. या भेटीत दोन्ही देशांनी ठरविलेली उद्दीष्टं पूर्ण करण्याला सध्या प्राधान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.