भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुक्त व्यापार कराराबाबत वाटाघाटी

भारत आणि न्यूझीलंड यांनी आज मुक्त व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटींना प्रारंभ केला. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकक्ले यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि व्यापारी संबंधांची मजबूत पायाभरणी करणाऱ्या एका मोठ्या भागीदारीची सुरुवात यामुळे होत असल्याचं गोयल म्हणाले. दोन्ही देशातला व्यापार सतत वाढत असून एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या काळात त्यानं १ अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.