भारत आणि नेपाळ यांच्यात आज नवी दिल्ली इथं मल-नि:सारण, आरोग्य विज्ञान आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सहकार्य वाढवण्याबाबत सामंजस्य करार झाला. दोन्ही देशातल्या नागरिकांना शुद्ध पेयजलाची उपलब्धता करून देण्यासाठी सहकार्य करण्याचा मुद्दाही या करारात अंतर्भूत आहे.
या कराराच्या माध्यमातून दोन्ही देशातलं सार्वजनिक आरोग्य, शाश्वतता, आणि प्रादेशिक सहकार्य वृद्धिंगत होईल असा विश्वास केंद्रीय जल शक्ती मंत्री सी आर पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केला.