डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विशेष दल प्रशिक्षण केंद्रात भारत-मंगोलियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू

मंगोलियातल्या उलानबातर इथल्या विशेष दल प्रशिक्षण केंद्रात भारत-मंगोलियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू आहे. कालपासून सुरू झालेला हा सराव येत्या १३ तारखेपर्यंत सुरू राहील. यात भारत आणि मंगोलियातल्या वाढत्या संरक्षण सहकार्याला प्रतिबिंबित करणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश असेल. या सरावसत्राचं उद्घाटन मंगोलियातले भारतीय राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे आणि मंगोलियाचे मेजर जनरल लखगवासुरेन गान्सेलेम यांच्या हस्ते झालं. दोन्ही मान्यवरांनी सहभागी सैन्यदलांना शुभेच्छा दिल्या.