आशियातील महत्त्वाचा दूरसंवाद आणि तंत्रज्ञान कार्यक्रम इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 चं उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. बदलासाठी नवोन्मेष ही या चार दिवसांच्या मेळाव्याची संकल्पना आहे. दूरसंवाद आणि डिजिटल तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन हा या कार्यक्रमाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. या मेळाव्यात होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये 6जी परिसंस्था, सायबर सुरक्षा, उपग्रह दूरसंवाद, कृत्रिम बुद्धीमत्ता, दूरसंवाद उत्पादन इत्यादी विषयांवर विचारविनिमय केला जाईल. दरम्यान केंद्रिय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांनी काल या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.
Site Admin | October 7, 2025 9:39 AM | IMC2025 | India Mobile Congress 2025
भारत मोबाईल कॉँग्रेसचं उद्या नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
