गुजरातमधे लोथल इथं प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय समुद्री नौकानयन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि संशोधन अहवालाचं प्रकाशन केंद्रीय बंदरं, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरिटाईम वीकच्या दुसऱ्या दिवशी झालं. भारताचा समुद्री नौकानयन क्षेत्रातला हजारो वर्षांचा प्रवास हा फक्त भारताचा नसून सर्व खंडांमधला परस्पर आदर आणि भागीदारीचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. समुद्री नौकानयन वारसा दिनाचं उद्घाटनही सोनोवाल यांनी केलं. लोथलमधलं हे संकुल आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ होईल, तसंच समुद्री नौकानयन क्षेत्रात नवनिर्मिती करण्यासाठी नव्या पिढीला प्रोत्साहन देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारताचा समुद्री नौकानयन इतिहास हजारो वर्षांचा असून तो जपायला मंत्रालय वचनबद्ध आहे, अशी ग्वाही बंदरं, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी दिली.
Site Admin | October 28, 2025 3:20 PM | Minister Sarbananda Sonowal
राष्ट्रीय नौवहन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं केंद्रीय बंदर विकास मंत्र्यांच्या हस्ते अनावरण