भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी इंडिया मेरीटाइम विक २०२५ या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं मुंबईत कायमचं केंद्र उभारावं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत त्यांनी इंडिया मेरीटाईम विकच्या आयोजनाचा आढावा घेतला. केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवालही यावेळी उपस्थित होते.
मेरीटाइम विक सारख्या कार्यक्रमांसाठी मुंबई हे एक योग्य ठिकाण आहे, असं ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी आहेत. त्याचा लाभ देशातल्या उद्योगांना व्हावा, असंही सोनोवाल म्हणाले. येत्या २७ तारखेपासून सुरू होणाऱ्या परिषदेत १०० पेक्षा जास्त देश, हजारो प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.