डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कोलंबो सुरक्षा परिषद सचिवालयाची स्थापना करण्यासाठी भारत, मालदीव, मॉरिशस आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामंजस्य करार

श्रीलंकेत कोलंबो सुरक्षा परिषद सचिवालयाची स्थापना करण्यासाठी भारत, मालदीव, मॉरिशस आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. या करारामुळे हिंदी महासागर क्षेत्रातल्या आव्हानांना तोंड देणं सोपं होणार आहे. भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर तिन्ही देशांच्या प्रतिनिधींनी या करारावर तसंच एका निवेदनावर काल स्वाक्षऱ्या केल्या. या चारही देशांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी स्थानिक सुरक्षेला प्राधान्य देण्याचं या करारान्वये ठरवलं आहे. हे चारही देश सागरी किनारपट्टी सुरक्षा, दहशतवाद आणि कट्टरतावाद, तस्करी तसंच आंतराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारी, सायबर सुरक्षा आणि आपत्कालीन सुरक्षा या मुद्द्यांवर परस्परांना सहकार्य करतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.