January 8, 2025 8:25 PM | India | Maldives

printer

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांच्यात द्विपक्षीय बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली.  या बैठकीत नियमित लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सुरक्षा प्रकल्प तसंच संरक्षण सहकार्य याविषयी दोघांमध्ये चर्चा झाली. भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य, सागरी सुरक्षा भागीदारीसाठी एकत्र काम करण्याबाबत वचनबद्धता दोन्ही देशांनी व्यक्त केली. 

यावेळी संरक्षण सहकार्य वाढवण्याबाबत ही दोघांमध्ये चर्चा झाली, मालदीवचे संरक्षण मंत्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते गोवा आणि मुंबईलाही भेट देतील.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.