भारत मोझांबिकला १० डिझेल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हज अर्थात रेल्वे इंजिनं निर्यात करणार आहे. ३ हजार ३०० अश्वशक्तीची ही प्रगत इंजिनं बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स या कंपनीनं विकसित केली आहेत. ती अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची असून त्यात चालकासाठी कलात्मक केबिन, शौचालय आणि फ्रिज अशा अनेक विशेष सुविधा उपलब्ध आहेत. रेल्वे मंडळाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी ही माहिती दिली. १० पैकी २ इंजिनं चालू महिन्यात मोझांबिकला पाठवली असून उर्वरित आठ या वर्षीच्या अखेरीस पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | June 27, 2025 6:19 PM | LOCOMOTIVES | Rail India
भारत मोझांबिकला १० डिझेल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हज निर्यात करणार