हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य कायम ठेवण्यात भारत आणि जपान यांच्यातली भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावते, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं ८व्या भारत-जपान हिंद प्रशांत मंचाला ते संबोधित करत होते. गेल्या काही दशकांमध्ये या दोन्ही देशांमधली भागीदारी आणखी मजबूत झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
नुकत्याच झालेल्या पूर्व आशिया परिषदेत जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांच्याशी झालेल्या चर्चेत, दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा तपशीलवार आढावा घेण्यावर एकमत झाल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.