May 5, 2025 6:57 PM | India-Japan

printer

भारत-जपानमध्ये द्विपक्षीय बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्यात नवी दिल्ली इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत जनरल नाकातानी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला, तसंच भारताला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. भारत आणि जपानच्या संरक्षण आणि सुरक्षा यंत्रणांचा आढावाही दोन्ही नेत्यांनी या बैठकीत  घेतला. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबबत दोन्ही नेत्यांंमधे सहमती झाली. भारत आणि जपान यांच्यातल्या वाढत्या संरक्षण सरावावर दोघांनीही समाधान व्यक्त केलं. तसंच सागरी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला. 

 

बैठकीआधी नाकातानी यांना तिन्ही सेवा दलांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. तसंच त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद जवानांना आदरांजली वाहिली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.